Home क्राईम भुसावळात चोरट्यांनी तीन बंद घरे फोडली (व्हिडीओ)

भुसावळात चोरट्यांनी तीन बंद घरे फोडली (व्हिडीओ)


chori

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील पंधरा बंगला भागातील एकाच रात्री चोरट्यांनी तिनं बंद घरे फोडली असून लाखो रूपयांचा ऐवज चोरून नेला आहे. रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.  चोरट्यांनी बंद घरे पाहुन परीसरातील  एकाच वेळी तीन घरे फोडल्याने परीसरात मोठी खळबळ उडाली आहे.

सुट्यामुळे लोक बाहेर गावी गेल्यावर चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. शुक्रवार रोजी रात्री ही घटना घडली आहे. घर मालक नसल्याने नेमका किती मुद्देमाल लंपास केला आहे ते समजु शकले नाही. तीन पैकी एक घर मालक मुकेश अमरोलीवा चोरीची घटना समजल्यानंतर घरी आले आहे. त्यांच्या घरातुन चोरट्यांनी एक लाखाचा ऐवज लंपास केला आहे. दोन घरांचे मालक अजून बाहेर गावी असल्याने नेमका किती ऐवज चोरीला गेला ते समजु शकले नाही. शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. शहरात अनेक ठिकाणी चोरी तलवार हल्ला सारख्या घटना घडल्याने पोलीसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound