Home Cities पाचोरा अभिनेत्री निशिगंधा वाड उद्या पाचोर्‍यात !

अभिनेत्री निशिगंधा वाड उद्या पाचोर्‍यात !

0
49

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अभिनेत्री निशिगंधा वाड यांच्या व्याख्यानाचे उद्या शहरात आयोजन करण्यात आले आहे.

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेतर्फे उद्या दिनांक २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७:३० वाजता स्मृतीगंध या एकदिवसीय व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शहरातील भडगाव रोडवरील श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात आयोजीत करण्यात आला आहे.

या व्याख्यानात सुप्रसिद्ध अभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड ह्या मला भेटलेल्या लेकी सुना या विषयावर व्याख्यान करणार आहेत. व्याख्यानास प्रमुख पाहुणे म्हणून पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार दिलीप वाघ, चेअरमन संजय वाघ, व्हाईस चेअरमन विलास जोशी, मानद सचिव ऍड. महेश देशमुख हे उपस्थित राहणार आहेत. या व्याख्यानाचा परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे सर्व संचालक, पदाधिकारी यांनी केले आहे.


Protected Content

Play sound