जळगाव प्रतिनिधी । मुस्लीम कब्रस्थान व ईदगाह ट्रस्टच्या कार्यकारिणीने एक एतिहासीक निर्णय घेण्यात आला. रमजान ईदच्या कार्यक्रमाची रूप रेषा ठरविल्यामुळे समाजातील सर्व घटकांना पूर्व कल्पना मिळेल व त्यांची मानसिकता सकारात्मक होऊन रमजान ईदची नमाजचा सोहळा व इतर कार्यक्रम वेळेवर होणार असल्याचा विश्वास ट्रस्टचे अध्यक्ष अब्दुल गफ्फार मलिक यांनी व्यक्त केला. पत्रक जनरल सेक्रेटरी फारूक शेख यांनी प्रसिद्धीला दिले आहे
ईदची नमाजची रूपरेषा याप्रमाणे राहणार
रमजान ईदच्या कार्यक्रमांची सुरूवात सकाळी ८.३० पासून होणार आहे. सकाळी ८.३० ते ८.४५ मुफ्ती अतिकउर रहेमानचे उर्दू मध्ये खुतबा (प्रवचन). सकाळी ८.४५ ते ८.५५ जनरल सेक्रेटरी फारूक शेख ट्रस्टचा आढावा सादर करतील. ८.५५ ते ९.०० अध्यक्ष अब्दुल गफ्फार मलिक ट्रस्टच्या पुढील कामकाजाचे प्रोजेक्ट सादर करतील. ९ ते ९.०५ ईद ची नमाज ची पद्धत मौलाना नासिर समजावून सांगतील. ९.०५ ते ९.१० ईद गाह ट्रस्टच्या कामासाठी जागेवरच चंदा जमा केला जाईल. ९.११ ते ९.१७ मौलाना उस्मान कासमी नमाज अदा करतील. ९.१८ ते ९.२५ अरबी खुतबा. ९.२६ ते ९.३५ दुआ. ९.३६ ते ९.४० आभार ईदमुबारक देऊन कार्यक्रमाची सांगता.
ट्रस्ट वतीने समाज बांधवांना केलेले आवाहन
ईदगाह मध्ये अत्यंत लहान मुलांना आणू नये, घरून येतांना वजू करूनच यावे, ईद गाह मध्ये ट्रस्टच्या विविध कामासाठी चंदा जमा करणार असल्याने तसेच इतर मदरसा व मस्जिदच्या कामासाठी सुध्दा चंदा द्यावयाचा असल्याने येतांना खिशात काही रक्कम घेऊन यावी. ईदगाहमध्ये वजूसाठी कासमवाडी कडून, ईदगाह मस्जिद कडून, व ईदगाह ऑफिसकडून येणाऱ्यासाठी व्यवस्था आहे, असे आवाहन अध्यक्ष गफ्फार मलिक, मानद सचिव फारूक शेख यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.