पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्हा कृषी विभागामार्फत घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत श्री. गो. से. हायस्कूल पाचोरा य विद्यार्थिनी कु. दूर्वा अभिजीत पाटीलने द्वितीय क्रमांक प्राप्त केला.
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष – २०२३ निमित्त जिल्हा कृषी विभागामार्फत घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत श्री. गो. से. हायस्कूल पाचोरा येथील इ. ८ वी ड ची विद्यार्थिनी कु. दूर्वा अभिजीत पाटीलने द्वितीय क्रमांक प्राप्त केला.
कु. दूर्वा अभिजीत पाटील व व तिला मार्गदर्शन करणारे शिक्षक पी. एस. पाटील यांचा नियोजन भवन जळगाव येथे जिल्हाधिकारी अमन मित्तल, जिल्हा कृषी संचालक डॉ. विकास पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. जळगाव यांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला.
दुर्वाच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष दिलीप वाघ, चेअरमन संजय वाघ, व्हा. चेअरमन विलास जोशी, मानद चिटणीस महेश देशमुख, शालेय समिती चेअरमन खलील देशमुख, तांत्रिक विभाग चेअरमन वासुदेव महाजन, शाळेच्या मुख्याध्यापिका प्रमिला वाघ, उप मुख्याध्यापक एन. आर. पाटील, पर्यवेक्षक आर. एल. पाटील, ए. बी. अहिरे व शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी अभिनंदन केले आहे.