मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | नाशिक पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीने आज अधिकृतपणे शुभांगी पाटील यांना पाठींबा दिला असून कॉंग्रेसमधून सत्यजीत तांबे यांचे निलंबन करण्यात आले आहे.
नाशिक पदवीधर मतदारसंघ आणि नागपूर शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार अद्याप ठरलेले नव्हते. तसेच अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले सत्यजीत तांबे यांच्यावरील कारवाई देखील प्रलंबीत होती. या पार्श्वभूमिवर, आज दुपारी महाविकास आघाडीने पत्रकार परिषद घेतली. यात कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि माजी मंत्री आ. जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. यामध्ये नाना पटोले यांनी सत्यजीत तांबे यांना पक्षातून निलंबीत करण्यात आल्याची माहिती दिली.
दरम्यान, नाशिक पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीने शुभांगी पाटील यांना पाठींबा दिल्याचे आज अधिकृतपणे जाहीर करण्यात आले. यामुळे येथील सस्पेन्स अखेर संपुष्टात आला आहे. तर सत्यजीत तांबे यांना लवकरच भाजप पाठींबा देणार असल्याची माहिती समोर आली आहे.