चाळीसगाव प्रतिनिधी । येथील पर्यावरण मित्र शालीग्राम निकम यांचा वाढदिवसानिमित्त युवा उद्योजक मंगेश चव्हाण यांनी सत्कार केला.
चाळीसगावचे युवा नेतृत्व तथा उद्योगपती मंगेशदादा चव्हाण यांनी कॉलनी परिसरातील रहिवासी जिल्हाआदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त व पर्यावरण मित्र शालिग्राम निकम यांचा ५१ व्या वाढदिवसाचे निमित्त साधून छत्रपती शिवरायांचे स्मृतिचिन्ह व शाल देऊन सरांचे अभिष्टचिंतन केले. भविष्यात पर्यावरण व वृक्षारोपण याबाबत चांगले काम करू असे त्यांनी आश्वासन दिल. यावेळी स्वयंभू प्रतिष्ठानचे शांताराम पाटील, भावेश कोठावदे, योगेश गव्हाणे, कपिल पाटील, सचिन पवार, अक्षय मराठे ,राज पाटील व इतर मित्रपरिवार उपस्थित होते.