चाळीसगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | चाळीसगाव – कन्नड रोडवर अपघात घडून जखमी झालेल्या इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसात अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, भडगाव येथील चिंतामण नारायण महाजन (वय-६५) हा इसम ३ जानेवारी रोजी रात्री ८ ते ८:३० वाजेच्या सुमारास चाळीसगाव- कन्नड रोड ओलांडून पायी जात होते. त्यात अचानक भरधाव वाहनाने मागून जोरदार धडक दिली. यावेळी झालेल्या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. त्यावर लागलीच औषधोपचारकामी त्यांना धुळे येथे हलविण्यात आले. त्यांच्यावर मागील आठ दिवसांपासून उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा अचानक मृत्यू झाल्याची घटना ११ जानेवारी रोजी सायंकाळी ७:५० वाजताच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिसात अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोना मनोज पाटील हे करीत आहे.