Home Cities एरंडोल अल्पवयीन मुलीचा फूस लावून पळविले

अल्पवयीन मुलीचा फूस लावून पळविले

0
56


एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एरंडोल शहरातील एका भागात राहणारी १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मंगळवारी १० जानेवारी रोजी सकाळी १० वाजता एरंडोल पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, एरंडोल शहरातील एका भागात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ९ जानेवारी रोजी सायंकाळी अल्पवयीन मुलगी ही घरी एकटी असतांना अज्ञात व्यक्तीने तिला काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेली. सायंकाळी मुलीचे पालक घरी आल्यावर मुलगी घरी नसल्याचे दिसून आले. त्यांनी तिचा सर्वत्र शोध घेतला असता ती कुठेही मिळून आली नाही. अखेर मंगळवारी १० जानेवारी रोजी सकाळी १० वाजता एरंडोल पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे.त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून एरंडोल पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि गणेश अहिरे करीत आहे.


Protected Content

Play sound