चाळीसगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील रोहिणी गावातील एका सेवानिवृत्त अभियंत्याचे बंद घर फोडून घरातील कपाटातून रोकडसह १ लाख बावीस हजारांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, चाळीसगाव तालुक्यातील रोहिणी गावातील नारायण तात्याराम वाघ (वय-५९) ह.मु. कल्याण जि. ठाणे हे वरील ठिकाणी परिवारासह वास्तव्याला असून ते एक सेवावृत्त अभियंता आहे. त्यांच्या रोहिणी गावातील घराचा कडीकोंडा तोडून घरातील कपाटात ठेवलेले १ लाख १० हजार रुपये रोख व १२ हजार रुपये किं.च्या हळदी कुंकवाचा करंडा असे एकूण १ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञाताने चोरून नेल्याचा धक्कादायक घटना ६ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता ते ८ जानेवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून नारायण तात्याराम वाघ यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सपोनि हर्षा जाधव हे करीत आहे.