Home Uncategorized मोठी बातमी : राज्यातील सत्ता संघर्षावर १४ फेब्रुवारी रोजी सुनावणी

मोठी बातमी : राज्यातील सत्ता संघर्षावर १४ फेब्रुवारी रोजी सुनावणी

0
63

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | उध्दव ठाकरे विरूध्द एकनाथ शिंदे यांच्यातील सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टात आता १४ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. यामुळे पुन्हा एकदा सुनावणी लांबणीवर पडली आहे.

शिवसेनेवर नेमकी मालकी कुणाची ? यावरून सुप्रीम कोर्टात उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे गट एकमेकांच्या समोर उभे ठाकले आहेत. यातील महत्वाची सुनावणी अपेक्षित होती. उध्दव ठाकरे यांच्यातर्फे आधीच हे प्रकरण सात न्यायमूर्तींच्या घटनापिठाकडे देण्याची मागणी करण्यात आली असून यावर कोर्ट कार्य निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

दरम्यान, आज सकाळी सव्वाअकराच्या सुमारास सुनावणी सुरू झाली. यात प्रारंभीच मुख्य न्यायाधिशांनी १४ फेब्रुवारी रोजी सुनावणी घ्यावी असे सुचित केले. यामुळे आता पुढील सुनावणी पुढील महिन्यात होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.


Protected Content

Play sound