जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील जेसीआय सेंट्रलची नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली आहे. अध्यक्षस्थानी सीए प्रसाद प्रवीण झंवर यांची तर सचिवपदी विकल्प विनोद बोथरा यांची निवड करण्यात आली आहे. नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा रविवारी ८ जानेवारी रोजी संध्याकाळी ७. ३० वाजता एमआयडीसी परिसरातील सुरभी लॉन येथे होणार आहे.
जेसीआय जळगाव सेंट्रलची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत मावळत्या अध्यक्ष वेणुगोपाल झंवर आणि सचिव तुषार बियाणी यांनी गतवर्षीच्या कार्याचा आढावा घेतला. सामाजिक उपक्रम, विविध प्रशिक्षण, सांस्कृतिक कार्यक्रम यासोबत स्नेह मिळावे याबाबतची माहिती त्यांनी दिली. जेसीआय जळगाव सेंट्रलतर्फे अत्यंत उत्साहामध्ये सामाजिक बांधिलकीचे कार्य घडून आले अशी माहिती त्यांनी दिली. यानंतर नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
नूतन कार्यकारणीमध्ये अध्यक्ष प्रसाद झंवर, सचिव विकल्प बोथरा यांसह उपाध्यक्ष हेमंत दिलीप आगीवाल, सहसचिव सीए प्रतिमा नमित जैन, विश्वस्त अंजली भूषण गादिया यांची निवड करण्यात आली आहे. नूतन कार्यकरिणीचा पदग्रहण सोहळा रविवार दि. ८ जानेवारी रोजी संध्याकाळी ७.३० वाजता एमआयडीसी परिसरातील सुरभी लॉन् येथे होणार आहे. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थिती द्यावी असे आवाहन जेसीआय जळगाव सेंट्रलतर्फे करण्यात आले आहे.