दहिगाव येथील आदर्श विद्यलयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील दहिगाव येथील आदर्श विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याजयंती निमित शिक्षकांनी व विद्यार्थ्यांकडून अभिवादन करण्यात आले.

आदर्श विघालयाच्या शिक्षीका मनीषा गजरे यांच्याहस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्याचं बरोबर शिक्षिका सौ मिना तडवी यांनी सावित्रीमाई फुले यांनी महीलांच्या शिक्षणासाठी केलेल्या भरीव कार्याचे महत्व आपल्या विचारातुन व्यक्त केले. साक्षरतेची वाट प्रकाशमान करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती यावल तालुक्यातील शाळा महाविद्यालय ,शासकिय कार्यालय व राजकीय पक्षांच्या कर्याल्यात सावित्रीबाई फुले यांना त्यांच्या जयंती निमित्तानेअभिवादन करण्यात आले,

ज्या काळात स्त्री शिक्षणाचा विचार सुद्धा केला जात नव्हता त्या काळात पुण्यात भिडे वाड्यात मुलींची शाळा काढली. मुलींना शिकवायला स्त्री शिक्षिका पाहिजे म्हणून स्वतः शिक्षण घेऊन, समाजाने फेकलेले शेणगोळे स्वीकारून आपले कार्य चालू ठेवले. पूर्वस्पृश्य बांधवांसाठी घरचे पाण्याचे हौद खुले केले. विधवांच्या केश वपनाला विरोध केला. फसवलेल्या विधवांचे बाळंतपण केलीत. त्यातील एका मुलाला दत्तक घेऊन आपले नाव दिले. हे सगळे आजच्या काळात देखील कुणी करू शकेल असे वाटत नाही. फुले दांपत्याने हे सगळे दीडशे वर्षांपूर्वी केले. महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले या समाजसुधारक व समाज सुशिक्षित करण्यासाठी सोसलेल्या हालअपेष्टा सोसून आपल्याला इथवर आणलं ;त्या दांपत्याला त्रिवार वंदन! त्रिवार मानाचा मुजरा!आदर्श विद्यालय दहिगाव येथे स्त्री सन्मान सप्ताहाच्या निमित्ताने प्रथम लोकनियुक्त सरपंच तथा शिक्षिका सौ. मिना राजू तडवी आणि शिक्षक प्रतिनिधी मनिषा गजरे याप्रसंगी शाळेचे पर्यवेक्षक आर.पी.साळूंके, ज्येष्ठ शिक्षक .एम.आर.महाजन , ए.ए.पाटील , सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू भगिनीं उपस्थित होते.

 

Protected Content