Home क्राईम महाविर नगरात विवाहितेची फिनाईन पिऊन आत्महत्येचा प्रयत्न

महाविर नगरात विवाहितेची फिनाईन पिऊन आत्महत्येचा प्रयत्न


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । हुंड्याच्या पैशांसह घरातील किरकोळ कारणावरून शिवीगाळ व मारहाण केल्याच्या रागातून विवाहितेने फिनाईल पिऊन आत्महत्या करण्याचा धक्कादायक प्रकार महाविर नगरात घडली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात सोमवारी २ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता पतीसह सासू यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील विशाल कॉलनी वाघ नगर येथील माहेर असलेल्या सुकेशनी रोनित मेढे (वय-२२) यांचा विवाह महावीर नगरातील रोनित मिलींद मेढे यांच्याशी आठ महिन्यांपुर्वी रितीरिवाजानुसार झाला आहे. लग्न झाल्यानंतर काही दिवसातच सासू आणि पती यांनी हुंड्याच्या पैशांच्या कारणावरून विवाहितेला शिवीगाळ व मारहाण करत होते. रविवारी १ जानेवारी रोजी रात्री १० वाजता पती रोनित आणि सासु यांनी किरकोळ कारणावरून शिवीगाळ व मारहाण करत घरातून हाकलून देण्याची धमकी दिली. या छळाला कंटाळून विवाहितेने बाथरूममधील फिनाईल पिऊन घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. विवाहितेने फोन करून आई व भावाला सांगितला. त्यांनी लागलीच धाव घेत मुलीचे घर गाठले व तिला अत्यवस्थ अवस्थेत असतांना खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. आता विवाहितेची प्रकृतीस्थिर आहे. दरम्यान, याप्रकरणी विवाहितने जिल्हापेठ पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरून सोमवारी २ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात पती रोनित मिलिंद मेढे आणि सासू अशा मिलिंद मेढे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जिल्हा पेठ पोलीस कर्मचारी करीत आहे.


Protected Content

Play sound