जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील निमखेडी शिवरातील अनुपम सोसायटीमधील बंद घर फोडून चोरट्यांनी रोकड व दागिण्यांसह ३५ हजारांचा मुद्देमाल लांबविल्याची घटना बुधवार, २८ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता समोर आली आहे. याप्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
जळगाव शहरातील निमखेडी शिवारात अनुपम सोसायटी येथे गणेश अशोक पाटील वय ४५ हे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. ते कुटुंबासह त्याच्या मूळ गावी नगरदेवळा जवळ असलेल्या होळ येथे गेले होते. यादरम्यान ११ डिसेंबर पासून घर बंद होते, हे घर फोडून चोरट्यांनी घरातून ९ हजार रुपये किंमतीचे ६ ग्रॅमचे कानातले, ४ हजार रुपये किंमतीचे चांदीचे दागिणे, व २२ हजार रुपये रोख असा एकूण 35 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल लांबविला. गणेश पाटील यांनी त्यांच्या मित्रास घराकडे लक्ष ठेवण्यास सांगितले होते, त्यानुसार २८ डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता मित्र गणेश पाटील यांचे घर पाहण्यासाठी आले असता, दरवाजा उघडा, कदाचित गणेश पाटील हे घरी आले असतील, म्हणून मित्राने गणेश पाटील यांना फोन केला, मात्र गणेश पाटील यांनी मी मूळ गावी असल्याचे सांगितले, त्यानंतर मित्राने घरात पाहणी केली असता, घराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले तर घरा सामान अस्ताव्यस्त पडलेला दिसला. त्यानंतर त्यांनी ही माहिती गणेश पाटील यांना दिली. माहिती मिळाल्यावर गणेश पाटील हे तातडीने जळगावात घरी पोहचले. घरात पाहणी केल्यावर घरातील दागिणे व रोकड लांबविल्याचे दिसून आले. गणेश पाटील यांनी याप्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अनिल मोरे हे करीत आहेत.