


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील निम ते कपिलेश्वर रोड दरम्यानच्या शेतावरील बांधावर पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आह. याप्रकरणी मंगळवारी २७ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता मारवड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, प्रदीप भगवान धनगर (वय-२७) रा. निम, ता. अमळनेर हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. नीम ते कपिलेश्वर रोडवर असलेल्या इंदुबाई पाटील यांच्या शेताच्या बांधावर त्यांची दुचाकी (एमएच १९ इबी ५९०९) ही दुचाकी सोमवारी २६ डिसेंबर रोजी दुपारी १ ते ४ वाजेच्या दरम्यान, लावलेली होती. अज्ञात चोरट्यांनी पार्किंगला लावलेली ६५ हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. काम आटोपून प्रदीप धनगर हे घरी जाण्यासाठी निघाले असता त्यांनी दुचाकी कुठेही मिळून आली नाही. परिसरात दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकी कुठेही मिळून आली नाही. अखेर मंगळवारी २७ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता प्रदीप धनगर यांनी मारवड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक सुनील तेली करीत आहे.



