Home Cities अमळनेर जवखेडा गावातून पशूधनाची चोरी !

जवखेडा गावातून पशूधनाची चोरी !


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील जवखेडा येथील शेतकऱ्याच्या मालकीच्या चार जर्सी गाय आणि दोन म्हशीचे पिल्ले अज्ञात चोरट्यांनी वाहनात कोंबून चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सोमवारी २६ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील जवखेडा येथील शेतकरी गोकुळ धोंडू पाटील (वय-६३) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांच्या मालकीच्या ५० हजार रूपये किंमतीच्या चार जर्सी गाय, दोन म्हशींचे पिल्लू आणि ईलेक्ट्रिक काटा असा मुद्देमाल (एम.एच. ०२ बी.डी. २४२८) यामधून चोरून नेल्याचे २६ डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास समोर आले आहे. याप्रकरणी गोकुळ पाटील यांनी सोमवारी २६ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक कैलास शिंदे करीत आहे.


Protected Content

Play sound