Home Cities जळगाव जळगाव येथे रविवारी हिंदु राष्ट्र जागृती सभेचे आयोजन (व्हिडीओ)

जळगाव येथे रविवारी हिंदु राष्ट्र जागृती सभेचे आयोजन (व्हिडीओ)

0
37

जळगाव –  लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहरात रविवार दि. २५ डिसेंबर रोजी हिंदु राष्ट्र जागृती सभेचे आयोजन करण्यात आले असून यात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन हिंदू जनजागृती समितीचे प्रशांत जुवेकर यांनी पद्मालय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत केले. याप्रसंगी हिंदू राष्ट्र सेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख मोहन तिवारी, योग वेदांत समितीचे अनिल चौधरी आदी उपस्थित होते.

 

प्रशांत जुवेकर यांनी  पत्रकार परिषदेत सांगितले की,  रविवार दि. २५ डिसेंबर रोजी हिंदू राष्ट्र जागृती सभेचे शिवतीर्थ मैदान येथे सायंकाळी ५ वाजता आयोजन करण्यात आले आहे. या सभेत प्रमुख वक्ता म्हणून सुदर्शन चॅनलचे मुख्य संपादक सुरेश चव्हाणके यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे, तसेच सनातन संस्थेचे सद्गुरू नंदकुमार जाधव, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र-छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट, रणरागिणी रागेश्री देशपांडे हे ही सभेला संबोधित करतील, अशी माहिती दिली.

मोहन तिवारी यांनी सांगितले की,  शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिक्षा युनियनने सभेच्या दिवशी सायंकाळी ज्या महिलांना सभेला यायचे असेल त्यांच्यासाठी सभेला मोफत पोचवून देण्याची व्यवस्था उत्स्फूर्तपणे केली आहे. या सभेसाठी १५० हुन अधिक गावात व्यापक प्रचार प्रसार करण्यात आला आहे. दरम्यान, दि. २३ डिसेंबर रोजी शहरात वाहन फेरीचे आयोजन  करण्यात आले आहे. या वाहन फेरीसं नेहरू पुतळा येथून सकाळी १० वाजता फेरीला  प्रारंभ करण्यात येणार आहे. या वाहन फेरीचा मार्ग चित्रा चौक, शिवतीर्थ, जिल्हाधिकारी कार्यालय जाऊन पुन्हा शिवतीर्थ येथे समारोप होणार असल्याची माहिती मोहन तिवारी यांनी दिली.


Protected Content

Play sound