जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील पिंप्राळा मधील रथ चौकातील तरुणाची १२ हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून येण्याची घटना समोर आली आहे. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, किशोर माधव महाजन (वय-३४) रा. बारीवाडा, रथ चौक, पिंप्राळा हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला असून खाजगी व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतो. दरम्यान त्याच्याकडे व्यवसाय करण्यासाठी दुचाकी (एमएच १९ बीसी ७४५३) क्रमांकाची दुचाकी आहे. या दुचाकी वरून तरूण आपला व्यवसाय करत असतो. दरम्यान १७ डिसेंबर रोजी रात्री १० वाजता त्याने त्याची दुचाकी त्याच्या घरासमोर पार्किंगला लावली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी १२ हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेली आहे. हा प्रकार रविवारी १८ डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजता समोर आला. त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला, परंतु दुचाकी कुठेही मिळून न आल्याने अखेर रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक जितेंद्र तावडे करीत आहे.
मध्यरात्री घरासमोरून तरूणाची दुचाकी लांबविली
2 years ago
No Comments