Home Cities जळगाव जळगावात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने शौर्य यात्रेचे आयोजन (व्हिडीओ)

जळगावात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने शौर्य यात्रेचे आयोजन (व्हिडीओ)

0
27

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  शहरातील वल्लभ वालजी वाचनालय येथून विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने रविवारी १८ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता शौर्य यात्राचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी यात्रेवर पुष्पवर्षाव करण्यात आला होता.

 

शहरातील वल्लभ वालजी वाचनालयाच्या मैदानात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्यावतीने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी रविवारी १८ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास शौर्य यात्रा काढण्यात आली. याप्रसंगी मान्यवरांच्याहस्ते ध्वजाचे पूजन करण्यात आले. तर शहरातील विविध भागातून शौर्य यात्रा काढण्यात आली. ही यात्रा वल्लभ वालजी वाचनालयाच्या मैदानापासून सुरूवात करण्यात आली. महापालिका चौक, लाल बहादुर शास्त्री टॉवर चौक, चित्रा चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पंडीत नेहरू चौक आणि  वल्लभ वालजी वाचनालयाच्या दरम्यान काढण्यात आली. याप्रसंगी भारत माता की जय… छत्रपती शिवाजी महाराज की जय,… जय भवानी जय शिवाजी…. अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. तसेच यासह हिंदूत्व वादी संघटनांनी देखील सहभाग नोंदविला होता. यानंतर  वल्लभ वालजी वाचनालयात सभेचे आयोजन करण्यात येवून उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.

भाग १

भाग २

भाग ३


Protected Content

Play sound