जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील सदोबा नगरातील मीराई पार्क येथे माहेर असलेल्या विवाहितेचा ५ लाख रुपये व दहा तोळे सोने या मागणीसाठी शारीरिक व मानसिक छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत शनिवारी १७ डिसेंबर रोजी रात्री १० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील सदोबा नगरात मीराई पार्क येथे माहेर असलेल्या ललिता गौरव खडके (वय-२९) यांचा विवाह रायगड जिल्ह्यातील पनवेल येथील गौरव ज्ञानदेव फडके यांच्याशी एप्रिल २०२२१ मध्ये रीतीरीवाजानुसार झाला आहे. लग्नानंतर अवघ्या ५ महिन्यानंतर पती गौरव खडके यांनी विवाहितेला माहेर होऊन घर घेण्यासाठी ५ लाखांची मागणी केली तसेच १० तोळे सोने देखील आणावे अशी, मागणी केली. दरम्यान विवाहितेने माहेरहून सोने व पैसे न आणल्यामुळे तिला शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच सासू-सासरे यांनी देखील पैशांची मागणी करत तगादा लावला. हा प्रकार सहन न झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या. शनिवार १७ डिसेंबर रोजी रात्री १० वाजता विवाहितेने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पती गौरव ज्ञानदेव खडके, सासू बासंती ज्ञानदेव खडके आणि सासरे ज्ञानदेव चुनीलाल खडके सर्व रा. पनवेल जिल्हा रायगड यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार राजेंद्र उगले करीत आहे.