आ. भोळे यांनी घेतली सुरेशदादा जैन यांची भेट

जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  माजी मंत्री सुरेशदादा जैन यांना  घरकुल घोटाळाप्रकरणी नियमित जामीन मिळाल्यानंतर ते बुधवारी शहरात दाखल झाले आहेत. त्यांच्या आगमनाने राजकीय वातावरणात चैतन्य निर्माण झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. दादांची काल गुरुवारी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी भेट घेतली आहे. तर आज भाजप आमदार  राजूमामा भोळे यांनी त्यांच्या निवास्थानी जावून भेट घेतली आहे. त्यांच्या या भेटीने शहरात चर्चेला उधाण आले आहे.

 

माजी मंत्री सुरेशदादा जैन हे ४ वर्षानंतर जळगाव शहरात दाखल झाले आहेत. त्यांची विविध सामाजिक संघटना, पक्षाचे कार्यकर्ते भेट घेत आहेत. आ, राजूमामा भोळे यांनी सुरेशदादा जैन यांना परभूत करून विधान सभेत प्रवेश मिळवला  होता.  आज शुक्रवार दि. १६ डिसेंबर रोजी सुरेशदादा यांची सदिच्छा भेट घेऊन आ. भोळे यांनी त्यांच्या सोबत चर्चा केली.  एकीकडे शिवसेनेचा शिंदे गट  भाजप सोबत गेलेला असतांना दादा मात्र ठाकरे गटात आहेत. याच पार्श्वभूमीवर आ. राजूमामा भोळे यांनी सुरेशदादा जैन यांची घेतलेली सदिच्छा भेट चर्चेचा विषय ठरला आहे.

 

Protected Content