Home क्राईम अज्ञात वाहनाच्या धडकेत वृध्दांचा उपचारादरम्यान मृत्यू

अज्ञात वाहनाच्या धडकेत वृध्दांचा उपचारादरम्यान मृत्यू

1
1

1
1

जळगाव प्रतिनिधी । भाजीपाला घेण्यासाठी आलेल्या 80 वर्षीय वयोवृध्दास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात सकाळी टॉवर चौकात आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडली असून याबाबत शहर पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हुसेन युसुफ भाटमल वय-80 रा. शिवाजी नगर हे भाजीपाला घेण्यासाठी सकाळी 9 वाजेच्या सुमारास गोलाणी मार्केट येथे जात असतांना मागून येणाऱ्या अज्ञात वाहनधारकाने धडक दिली. त्यात ते जखमी झाले. त्यांना एका रिक्षाचालकाने जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांची मुलगी आणि नात यांनी त्यांची प्रकृती पाहून तातडीने खासगी रूग्णालयात दाखल केले. मात्र हुसेन यांच्या प्रकृतीअधिक बिघडल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी शहर पोलीसात घटनेची नोंद करण्यात आली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound