Home क्राईम जळगाव रेल्वेस्थानकावर अनोळखी पुरूषाचा मृतदेह आढळला

जळगाव रेल्वेस्थानकावर अनोळखी पुरूषाचा मृतदेह आढळला

0
54


जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  रेल्वे स्थानकावरील प्लॅटफार्म क्रमांक ३ वर शुक्रवारी २ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता अंदाजे ४२ वर्षीय अनोळखी पुरूषाचा मृतदेह आढळून आला आहे. याबाबत जळगाव रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

जळगाव रेल्वे पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील रेल्वेस्थानक परिसरातील प्लॅटफार्म क्रमांक ३  येथे एका अनोळखी अंदाजे ४२ वर्षीय पुरूषाचा मृतदेह शुक्रवारी २ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता आढळून आला. या घटनेची माहिती येथील स्टेशनप्रबंधक यांनी जळगाव रेल्वे पोलीसांना दिली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगाव रेल्वे पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. मयत झालेल्या अनोळखी व्यक्तीजवळ ओळख पटविण्यासाठी कोणतीही माहिती मिळाली नाही. मयताच्या उजव्या हातावर श्रीराम असे नाव गोंधलेले आहे. मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला आहे. जळगाव रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताची ओळख पटविण्याचे आवाहन जळगाव रेल्वे पोलीसांनी केले आहे.


Protected Content

Play sound