Home क्राईम डॉ.पायल तडवी आत्महत्या प्रकरण : आरोपी डॉक्टरांना पोलीस कोठडी

डॉ.पायल तडवी आत्महत्या प्रकरण : आरोपी डॉक्टरांना पोलीस कोठडी


dr.payal tadavi
 

मुंबई (वृत्तसंस्था) नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवीला जातीय छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तिन्ही महिला डॉक्टरांना मुंबईतील विशेष न्यायालयाने ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी डॉ. भक्ती मेहर, डॉ. हेमा आहुजा आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या तिघींना अटक करण्यात आली आहे.

 

तिन्ही महिला डॉक्टरांना आज विशेष न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. एम. सदरानी यांच्यासमोर हजर करण्यात आले होते. पायलने लिहून ठेवलेली सुसाइड नोट हा या घटनेतील महत्त्वाचा पुरावा असून हा पुरावा या तिघींनी नष्ट केल्याचा संशय आहे. त्याबाबत चौकशी करण्यासाठी तिघींनाही पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी पोलिसांच्या वतीने करण्यात न्यायालयात आली. ही मागणी मान्य करत न्यायालयाने तिघींनाही ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound