Home क्राईम पोलीस दलाचा शनिवारी जनता दरबार

पोलीस दलाचा शनिवारी जनता दरबार


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्हा पोलीस दलातर्फे जिल्हाभरातील नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी ३ डिसेंबर शनिवारी सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत पोलीस मुख्यालयातील मंगलम हॉल येथे तक्रार निवारण (जनता दरबार) चे आयोजन करण्यात आले आहे.

यामध्ये पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधीक्षक गृह तथा प्रभारी उपविभागीय अधिकारी संदीप गावीत यांच्यासह सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी उपस्थित राहणार आहे. तरी नागरिकांनी आपल्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी व अडीअडची सोडविण्यासाठी जनता दरबारात उपस्थित राहण्याचे आवाहन पोलीस दलाकडून करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound