Home क्राईम अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले


भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने पोस्ट लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, किरकोळ व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करणारे व्यक्तीची १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही २८ नोव्हेंबर रोजी दुपारी १२. ३० ते १ वाजेच्या दरम्यान घरी असतांना अज्ञात व्यक्तीने तिला फुस लावून पळून नेल्याचे समोर आले आहे. अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. परंतु ती कुठेही मिळून न आल्याने अखेर पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक अमोल पवार करीत आहे.


Protected Content

Play sound