चोपडा (प्रतिनिधी)। येथील नगरपालिकेचे कामकाज हे रामभरोसे सूरु आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शहरातील मुख्य रस्त्यावरची खड्डे लवकरात लवकर बुजविण्यात यावे, यासाठी निवेदन देण्यात आले होते. मात्र नगरपालिकेतच आवक जावकच्या कार्यलयामध्ये आणि बाहेर स्टाईल उखडून गेले असून चक्क तीन ठिकाणी स्टाईल उखडून निघून गेल्या आहेत.
नागरीकांच्या अनेक तक्रारी
याबाबत माहिती घेतली असता, स्टाईल्स निघून अनेक दिवस झाले असून दुरूस्तीसाठी अजून काहीही प्रयत्न दिसून येत नसल्याचे सांगण्यात आले. गटारी तुडुंब भरून भर उन्हात मुख्य रस्त्यावरून पाणी वाहते. लहान भोई वाड्यात अनेक दिवसांपासून गटारी साफ झालेले नाही. संबंधित गटारी साफ करण्यासाठी देखील निेवेदने दिली आहेत. लाखो रुपयाला शिरपुररोड वरील सावित्रीबाई फुले, शॉपिंग सेंटर विकले गेले. मात्र यात पाण्याचा निचरा व इतर सुविधा उपलब्ध करून दिलेल्या नसल्याने दुकानदारांना अनेक अडचणींचा समाना करावा लागत आहे. एकीकडे पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणावर भासत असतांना शहरातील काही भागात रस्त्यावर पाणी मारणें, फोर व्हिलर गाड्या धुणे, गटारीत नळ सोडणे असा प्रकार होत आहे. अश्यांवर कारवाई करण्याची गरज आहे.