Home Cities जळगाव महापालिका आयुक्तांची बदली : देवीदास पवार यांची नियुक्ती

महापालिका आयुक्तांची बदली : देवीदास पवार यांची नियुक्ती

0
122

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांची बदली झाली असून त्यांच्या जागी आज देविदास पवार हे रूजू होणार आहेत.

जळगाव महापालिकेच्या आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांची बदली झाली असून याबाबतचे आदेश नगरविकास खात्यातर्फे काढण्यात आले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून आयुक्तांच्या बदलीचे वारे वाहू लागले होते. विशेष करून त्यांच्या कार्यशैलीवर भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक व नेते नाराज होते. तर अलीकडेच महापौरांनी देखील त्यांच्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली होती. यामुळे त्यांची बदली करण्यात आल्याचे वृत्त आहे.

दरम्यान, देविदास पवार हे सध्या परभणी येथील आयुक्त असून ते आज जळगाव महापालिकेची सूत्रे सांभाळणार आहेत.


Protected Content

Play sound