जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या बहि:स्थ शिक्षण आणि अध्ययन विभागाद्वारे बहिणाबाई चौधरी यांच्यावरील प्रमाणपत्र शिक्षणक्रमाचा एक भाग म्हणून बहिणाबाई यांच्या जळगाव येथील निवासस्थानी तसेच आसोदा येथील त्यांच्या माहेरी विद्यार्थ्यांच्या क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले.
या विभागामार्फत ‘कवयित्री बहिणाबाई चौधरी : जीवन आणि काव्य’ हा ऑनलाईन प्रमाणपत्र शिक्षणक्रम सुरु आहे. बहिणाबाई यांचे जळगाव येथील निवासस्थान म्हणजे बहिणाबाई मेमेारियल ट्रस्ट चौधरी वाडा तसेच बहिणाबाईंचे माहेर असलेले आसोदा येथे या शिक्षणक्रमाच्या विद्यार्थ्यांनी भेट दिली. बहिणाबाईंची नातसून पद्माबाई चौधरी तसेच अशोक चौधरी यांच्याशी विद्यार्थ्यांनी संवाद साधला. विभागाच्या प्रभारी संचालक डॉ. मनिषा इंदाणी यांच्या मार्गदर्शनाखाली, समन्वयक डॉ. मनीषा जगताप, कल्पेश पाटील, कुलदिप साळुंखे यांनी या क्षेत्रभेटीचे आयोजन केले होते.