जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | किशोरवस्था हा जीवनातील महत्वाचा टप्पा आहे. संप्रेषणच्या बदलामुळे या वयात शरीरात मानसिक, शारीरिक आणि भावनिक बदल होत असतात यामुळे सामाजीक तर प्रसंगी असामाजिक वर्तन देखील या वयात घडते त्यामुळे हे बदल समजून घेणे गरजेचे आहे असे मार्गदर्शन प्राजक्ता पाटील यांनी विद्यार्थी संवादात केले.
यावेळी व्यासपीठावर ए. टी. झांबरे शाळेच्या मुख्यध्यापिका प्रणिता झांबरे, के.सी.ई सोसायटीचे जनसंपर्क अधिकारी प्रा.संदीप केदार, रेडिओ मनभावनचे समन्वयक अमोल देशमुख उपस्थित होते. युनिसेफ अँड स्मार्ट नवी दिल्ली या विभागाअंतर्गत रेडिओ मनभावन 90.8एफ.एम. ने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
पुढे बोलतांना त्यांनी सांगितले की किशोरवस्था यात मुलां- मुलींच्या शरीरात बदल घडतात त्याप्रमाणेच शारीरिक वाढ देखील त्याच वेगाने होत असते. यासाठी मुलांनी चौरस आहार, फळे तसेच लोहयुक्त पदार्थ, दुग्धजन्य पदार्थांचा आहारात समावेश करावा.
काही वेळेस पूरक आहार न घेतल्याने या वयातील मुलांना रक्तक्षय, चक्कर येणे, धाप लागणे, थकवा येणे, अभ्यासाचा कंटाळा येणे ही लक्षणे दिसतात हे सर्व टाळता यावे यासाठी योग्य आहार, नियमित व्यायाम करणे, देखील तितकेच गरजेचे आहे कारण सुदृढ शरीरसंपत्ती हाच निरोगी जीवनाचा पाया आहे असा मोलाचा सल्लाही त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला.
यावेळी सहावी ते आठवी या वर्गातील विद्यार्थी- विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.