मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राज्याचे माजी मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज बेलदार समाजातर्फे त्यांना अभिवादन करण्यात आले.
महाराष्ट्राचे द्वितीय मुख्यमंत्री बेलदार समाज भूषण मारोतराव उर्फ दादासाहेब कन्नमवार यांची पुण्यतिथी आज उत्साहात साजरी करण्यात आली. दादासाहेब कन्नमवार यांच्या पुण्यभूमीत काम केलेले मुक्ताईनगरचे पोलीस इन्स्पेक्टर विठ्ठल ससे यांना विशेष आमंत्रित करण्यात आले. त्यांच्यासह बेलदार समाजातील जेष्ठ कार्यकर्त्यांकडून प्रतिमा पूजन करण्यात आले.
याप्रसंगी बेलदार समाज महासंघटनेचे राज्य अध्यक्ष जानकीराम पांडे यांचे वडील देवचंदराव पांडे व सेवानिवृत्त वनपाल तुकाराम घाटे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून त्यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवण्याा संकल्प करण्यात आला. जानकीराम पांडे यांनी दादासाहेब कन्नमवार यांचा राज्याच्या जडणघडणीत केलेल्या कार्याबद्दल समाज बांधवांना माहिती दिली. तर पोलीस इन्स्पेक्टर विठ्ठल ससे यांनी कन्नमवार साहेब यांच्याशी संबंधित वेगवेगळ्या संस्थांची,माहिती पुरवून कन्नमवार साहेबांच्या आठवणींना उजाळा दिला.
यावेळी बेलदार समाज महासंघटनेचे कार्यकर्ते जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष पंकज घटे,ब्रिजलाल पाखरे, समाधान पांडे, निलेश घटे गणेश घटे, शांताराम बेलदार,मुकेश घटे,राजेश पांडे, किशोर घटे,किशोरमुंडे आदी समाज बांधव उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन बेलदार समाज युवक महासंघटने कडून करण्यात आले होते. याप्रसंगी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.