Home क्राईम महिलेला मारहाण करून विनयभंग

महिलेला मारहाण करून विनयभंग


चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोपडा तालुक्यातील चहार्डी गावातील एका महिलेचा घरात घुसून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत चोपडा शहर पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, चोपडा तालुक्यातील चहार्डी गावात ५२ वर्षीय महिला ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. दरम्यान जुन्या भांडणाच्या कारणावरून गावातील आशाबाई अभिमान शिरसाठ व भरत अभिमान शिरसाट यांनी महिलेच्या घरात घुसून तिला मारहाण केली. तसेच तिच्या भाच्याला देखील मारहाण केली. विवाहितेला अश्लील शिवीगाळ करत तिचा विनयभंग केला आणि जिवे ठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर महिलेने चोपडा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन दोन जणांविरोधात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी भरत अभिमान शिरसाठ आणि आशाबाई अभिमान शिरसाठ यांच्या विरोधात चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रदीप राजपूत करीत आहे.


Protected Content

Play sound