Home क्राईम कैलास नेहमीच देत होता जीवे मारण्याची धमकी : आशा माळी यांचा आरोप

कैलास नेहमीच देत होता जीवे मारण्याची धमकी : आशा माळी यांचा आरोप

bacc7b4b cd54 4cdb 881f 3e5171cfa842
bacc7b4b cd54 4cdb 881f 3e5171cfa842

bacc7b4b cd54 4cdb 881f 3e5171cfa842

जळगाव (प्रतिनिधी)  कैलास माळी हा नेहमीच मुलांना मारहाण करत होता. तसेच पाच पैकी एकाला संपवून टाकेल, अशी धमकीही नेहमीच देत होता, असा आरोप मृत महेशच्या कुटुंबीयांनी आज ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’ शी बोलताना केला.

 

घरात किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणातून छातीत लाथ मारल्याने महेश नावाच्या चार वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याचा खळबळजनक प्रकार जळगावात काल दुपारी घडला होता. तेव्हापासून संशयित आरोपी फरार झाला असून त्यास तात्काळ अटक कारण्याची मागणी त्या चिमुकल्याच्या कुटुंबियांनी केली आहे. या चिमुकल्याची आई आशा कैलास माळी हिला काल घडलेल्या हृदयद्रावक घटनेबाबत बोलतांना रडूच कोसळले. त्याचवेळी फरार आरोपी कैलास माळी हा वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून धमकी देत असून त्यास तत्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी यावेळी तिने केली. कैलास माळी हा नेहमीच मुलांना मारहाण करत होता. तसेच पाच पैकी एकाला संपवून टाकेल, अशी धमकी नेहमीच देत होता, अशी माहितीही कुटुंबियांनी यावेळी दिली.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound