जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी बंजारा समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याच्या निषेधार्थ जामनेर तालुक्यातील बंजारा समाजाच्या वतीने नायब तहसीलदार यांना निवेदन दिले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जामनेर शहरातील मार्केट कमिटी येथे राष्ट्रवाी काँग्रेस पार्टी भटक्या विमुक्ती जाती जमाती समाजाचा मेळाव्याचे आयोजन गुरूवारी १७ नोव्हेंबर रोजी करण्यात आले होते. याप्रसंगी आमदार खडसे यांनी बंजारा समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान केले त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील बंजारा समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे यांनी बंजारा समाजाची जाहीर माफी मागावी अन्यथा राज्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातून दिला आहे.
याप्रसंगी बंजारा समाजाचे नेते रमेश नाईक, रामकिसन नाईक, बाळू चव्हाण, उदल नाईक, मनोज जाधव, भाईदास चव्हाण, गोपाल नाईक, देविदास चव्हाण, मेघराज नाईक, लालचंद चव्हाण, अर्जुन जाधव, विकास तवर, किशोर नाईक, न्यानेश्वर तवर, विश्वनाथ चव्हाण, चंदुलाल राठोड, जगदीश चव्हाण यांच्यासह बंजारा समाज बांधव मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.