जळगाव (प्रतिनिधी) स्विमिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्यावतीने सब ज्युनियर व ज्युनिअर राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा व वॉटरपोलो अजिंक्यपद स्पर्धा २०१९ चे आयोजन पुणे येथील बालेवाडी क्रीडा संकुलणात ३१ मे ते २ जून २०१९ दरम्यान करण्यात आले आहे. या स्पर्धेकरिता जळगाव जिल्हा हौशी जलतरण असोसिएशनच्या वतीने पोलीस जलतरण तलाव येथे जिल्हा निवड चाचणी स्पर्धा घेण्यात आली होती. या चाचणीतून चाळीस खेळाडूंचा संघ निवडण्यात आला आहे.
या खेळाडूंना कांताई हॉल जळगाव येथे आज एका छोटेखानी कार्यक्रमात असोसिएशन तर्फे टी-शर्ट देण्यात येऊन त्यांना शुभेच्या देण्यात आल्या. या संघात निवड झालेले खेळाडूंची नावे (१७ वर्षाखालील मुले) वैभव किशोर सोनवणे, वर्धन सुदीप जावळीकर, शुभम युवराज काळे, स्मित संजीव पाटील तर मुलींमध्ये जान्हवी शिवाजी पाटीलचा समावेश आहे.
१४ वर्षाखालील मुलांमध्ये निकेत प्रदीप चौधरी, कार्तिक लीलाधर काकडे, प्रतीक सुनील दातील,लोकेश विजय खाचणे,युगेश महेंद्र शिरसाळे,यश पुरुषोत्तम बागल,क्रिश अविनाश बारी,अनुज विजय गोसावी, रिषी साहेब दादलवार,यज्ञेश कांतीलाल राणेचा समवेश आहे. तर मुलींमध्ये गौतमी चेतनसिंग देवरे,रुजुल अनिल शिरसाळे,अस्मी राकेश गावंडे,लाजरी विजय खाचणे,जीविका रणजीत मराठेचा समावेश आहे.
११ वर्षांखालील मुलांमध्ये सर्वेश सुजित कुलकर्णी,प्रथमेश चंद्रशेखर बाविस्कर,आर्यन मुकेश सोनारचा समावेश आहे. तर मुलींमध्ये डिंपल विनायक चौधरी,जान्हवी मनोज झोपे, निधी सत्यजित पाटीलचा समावेश आहे. त्याचपद्धतीने १० वर्षाखालील मुलांमध्ये नैतिक सचिन साळुंखे, अर्णवसिंग चेतन सिंग देवरे,ऋग्वेद सचिन वाणी,कार्तिक सुनील पाटील,प्रथमेश निलेश चंदनचा समावेश आहे. तर मुलींच्या संघात रिद्धी कमलेश नगरकर,हिमांशी किरण पाटील, तनिष्का हरीश परमार,अन्वी संदीप चौधरी यांची निवड करण्यात आलेली आहे.
संघ व्यवस्थापक म्हणून ईश्वर खंदार व सौ रेवती नगरकर तर प्रशिक्षक म्हणून कमलेश नगरकर यांची नियुक्ती केल्याचे सचिव फारूक शेख यांनी घोषित केले. सदर जलतरणपटू यांना जळगाव जिल्हा हौशी जलतरण असोसिएशन अध्यक्ष सौ रेवती नगरकर, उपाध्यक्ष राजेंद्र ओक, सचिव फारुक शेख, किशोर नेवे, ईश्वर खंदार, रमेश सोनवणे व नरेंद्र चौहान यांनी शुभेच्छा दिल्या.