मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । माजी खासदार तसेच काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आपल्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं ट्विट स्वत: संजय निरुपम यांनी केलं आहे.
खासदार गजानन कीर्तिकर यांनी नुकतंच बाळासाहेबांची शिवसेनामध्ये प्रवेश केला. त्यांनी केलेला पक्षप्रवेश उत्तर पश्चिम मुंबईतील मतदारांचा अपमान असल्याचं सांगत त्यांनी त्वरित खासदारकीचा राजीनामा द्यावा, या मागणीसाठी माजी खासदार व काँग्रेस नेते संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली बाईक रॅली काढण्यात येणार होती. पण त्यापूर्वीच पोलिसांनी संजय निरुपम अटक करून, त्यांना वर्सोवा पोलिस ठाण्यात नेले व बाईक रॅली काढण्यास अटकाव करण्यात आला.
पोलीस माझ्या घरात घुसले आणि मला जबरदस्तीने ताब्यात घेतलं. मला वर्सोवा पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. हे पोलिसांचं गुंडाराज आहे, असं ट्विट संजय निरुपम यांनी केलं आहे.