Home क्राईम दुचाकीवरून घसरल्याने तरूण जखमी

दुचाकीवरून घसरल्याने तरूण जखमी


accident 1

जळगाव प्रतिनिधी । कामाचे पैसे घेण्यासाठी नेरी येथे दोघेजण दुचाकीने जात असतांना दुकावरून घसरल्याने 18 वर्षीय तरूण जखमी झाल्याची घटना दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत माहिती अशी की, अनिल अशोक गायकवाड (वय-18) रा. गाडेगाव हा एका कंपनीत कामाला आहे. मजूरीचे पैसे घेण्यासाठी अनिल आपल्या मित्रासह दुचाकीने गाडेगावहून नेरीला जात होते. नेरी जवळील घाटातून जात असतांना समोरून अचानक आयशर ट्रक आल्याने अपघाताच्या भितीने दुचाकी थेट रोडच्या खाली उतरवली. मात्र उतार असल्याने दुचाकी थेट बाजूच्या नाल्यात जावून पडली. यात अनिलच्या पायाला आणि हाताला दुखापत झाली. नातेवाईकांसह मित्रांना जखमी अवस्थेत शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound