मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शेलक्या शब्दांमध्ये टीका केली आहे.
काल रात्री ठाकरे आणि शिंदे गटात राडा झाल्यानंतर आज अरविंद सावंत यांनी पत्रकारांशी वार्तालाप करतांना सत्ताधार्यांवर जोरदार टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या मागे असंसदीय, असंवैधानिक, बेकायदेशीर, घटनाबाह्य हे एक मोठे लांच्छन लागले आहे. आता त्यांच्या पायाखालची वाळू सरकते आहे, अशा प्रतिक्रिया येत आहेत.
अरविंद सावंत पुढे म्हणाले की, कालपरवा तर माजी मुख्यमंत्री मला बदला घ्यायचा होता, असे स्पष्ट म्हणाले. त्यामुळे महाराष्ट्राला हे कळले की, माजी मुख्यमंत्री सौजन्याची मूर्ती नाहीत. ती सूडाची मूर्ती आहे. ते ही महाराष्ट्राला कळत चाललंय. हे एकेक समोर येतंय, अशी टीका त्यांनी केली. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कायम खोटे बोलत असल्याची टीका देखील त्यांनी केली.