चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील शास्त्री नगरातील बंद घर फोडून अज्ञातचोरट्यांनी घरातील ११ लाख ६९ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दत्तात्रय भिला मालपूरे (वय-५२) रा. शास्त्री नगर, योगेश कॉलनी,चाळीसगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शिक्षक असून खासगी शाळेत ते नोकरीला आले. ११ नोव्हेंबर रोजी दुपारी २ ते १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता त्यांचे बंद असतांना अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून घरातील ११ लाख ६९ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने असा मुद्देमाल चोरून नेल्याचे समोर आले आहे. ते घरी आल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. दत्तात्रय मालपुरे यांनी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आव्हाड करीत आहे.