Home क्राईम विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्यांविरुद्ध गुन्हा 

विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्यांविरुद्ध गुन्हा 

0
26

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील जुना खेडी रोड परिसरातील विवाहितेने माहेरुन १५ लाख रुपये आणावेत या कारणावरुन तिचा छळ करणाऱ्या पतीसह तीन जणांविरोधात मंगळवार, ८ नोव्हेंबर रोजी शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार असे की, जळगाव शहरातील जुना खेडी रोड परिसरातील माहेर असलेल्या रुपाली सचिन शेंद्रे यांचा अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील सचिन रामेश्वर शेंद्रे यांच्याशी विवाह झाला आहे. लग्नानंतर २४ फेब्रुवारी २०२१ ते ८ नोव्हेंबर २०२२ या काळात रुपाली हिने माहेरुन १५ लाख रुपये आणावेत या कारणासाठी तिचा पतीसह सासरच्यांनी शिवीगाळ तसेच माहराण करत शारिरीक व मानसिक छळ केला, तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. छळाला कंटाळून रुपाली ह्या माहेरी निघून आल्या व मंगळवारी त्यांनी याबाबत शनिपेठ पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरुन रुपाली हिचे पती सचिन शेंद्रे, सासू मनोरमा रामेश्वर शेंद्रे, सासरे रामेश्वर नागोराव शेंद्रे सर्व रा. परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रमोद विनायक पाटील हे करीत आहेत.

 


Protected Content

Play sound