जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिच्यावर अत्याचार करणार्या लखन उर्फ विजय रमेश गायकवाड (वय-२४, रा. गिरड ता. भडगाव) या नराधमाला विशेष पोस्को न्यायालयाने २० वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच त्याला मदत करणारा अतुल उर्फ योगेश राजू गायकवाड याला पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.
भडगाव तालुक्यातील गिरड येथील लखन उर्फ विजय रमेश गायकवाड याने २५ मे २०१८ रोजी सकाळी ५ वाजच्या सुमारास अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले होते. तसेच सुमारे तीन महिने तिच्यावर अत्याचार केला. त्याला पळवून नेण्यासासाठी संशयीत अतुल उर्फ योगेश राजू गायकवाड याने मदत केली होती. या दोघांविरुद्ध पिडीतेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन पोस्कोतर्ंगत भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासअधिकारी पोलीस उपनिरीक्षक आनंद पटारे यांनी गुन्ह्याचा तपास करुन न्यायालयात दोषरोप पत्र सादर केले होते. हा खटला विशेष पोस्को न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी. एस. महाजन यांच्या न्यायालयात चालविण्यात आला. सरकारपक्षाकडून ११ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. यामध्ये पीडीता, तिची आई या दोघांची साक्ष महत्वपुर्ण ठरली. त्यानुसार आरोपी लखन उर्फ विजय गायकवाड याला २० वर्ष सश्रम कारावास व ४३ हजारांचा दंड ठोठावला. सरकारपक्षातर्फे अति. शासकीय अभियोक्ता व विशेष सरकारी वकील ऍड. चारुलता बोरसे यांनी कामकाज पाहिले. तसेच पैरवी अधिकारी म्हणून विजय पाटील यांनी सहकार्य केले.