Home Cities जामनेर कृषी मंत्री सत्तार व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन

कृषी मंत्री सत्तार व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन

0
43

पहूर, ता. जामनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी |  येथे कृषी मंत्री अब्दुल सत्तार व पालकमंत्री गुलाबराव पाटील या दोघांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन राष्ट्रवादी व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) यांनी करून निषेध व्यक्त केला.

 

महिलांबद्दल अपशब्द वापरून पुरोगामी महाराष्ट्राच्या मंत्र्यांकडून महिलेचा अपमान समस्त स्त्री शक्तीचा अपमान आहे. कृषिमंत्री अब्दुल सत्तार व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन व निषेध व्यक्त करण्यात आला. येथील बस स्टँड परिसरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करून या दोघी मंत्रांचा निषेध करण्यात आला. दोघा मंत्र्यांवर कायदेशीर कारवाई करून त्यांना मंत्रिपदावरून बढतर्फ करावे अशी मागणी करण्यात आली. यावेळी पहूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक संजय बनसोडे यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय गरुड, शिवसेनेचे नेते गणेश पांढरे, शहर प्रमुख शिवसेना संजय तायडे, उपसरपंच श्याम सावळे, ईश्वर बाबुजी जैन पतसंस्थेचे चेअरमन भास्कर पाटील, शैलेश पाटील, राजू जंटलमेन, ग्रामपंचायत सदस्य शरद पांढरे, ईश्वर बारी,  शहर अध्यक्ष आशिष माळी, ज्ञानेश्वर करवंदे, तोफिक तडवी, नितीन पाटील, यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 


Protected Content

Play sound