अमळनेर प्रतिनिधी । तालुक्यातील कळमसरे येथील रतिलाल आत्माराम महाजन यांचे अल्पशा आजाराने निधन झाले असून त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी अंत्यसंस्कार होणार आहेत.
कळमसरे ता.अमळनेर येथील रतिलाल आत्माराम महाजन (वय- ६१)यांचे आज ता.२८ रोजी सकाळी ६.३० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा दुपारी ३ वाजता राहत्या घरापासुन निघणार आहे. ते राजेंद्र आत्माराम महाजन ,मधुकर आत्माराम महाजन यांचे मोठे बंधु तर मनोहर रतिलाल महाजन यांचे वडील होते.तर संदीप सुरेश महाजन यांचे काका होत.