Home क्राईम सोन्याची पोत लांबविणाऱ्या अल्पवयीन मुलीला पकडले

सोन्याची पोत लांबविणाऱ्या अल्पवयीन मुलीला पकडले


जळगाव प्रतिनिधी | शहरातील फुले मार्केटमध्ये नातेवाईकांसोबत खरेदी करत असतांना बीडच्या महिलेच्या गळ्यातील सात ग्रॅमची सोन्याची मंगलपोत अंत्यत चलाखीने तोडून लांबवून पळण्याच्या प्रयत्नातील अल्पवयीन मुलीला रंगेहाथ पकडल्याची घटना सोमवारी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास घडली. सतर्क महिलेला वेळीच प्रकार लक्षात आल्याने नुकसान टळले. आई वडीलांच्या शोधार्थ मुलीने महिलांना चांगलेच भटकाविले अखेर मिळून न आल्याने महिलेसह तिच्या नातेवाईकांनी मुलीला शहर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

रामेश्‍वर कॉलनी येथील प्रमिला गणेश कदम यांच्याकडे त्याच्या बीड येथील नणंद व नातेवाईक आले आहे. हे नातेवाईक मंगळवारी रात्री बीडकडे रवाना होणार आहेत. त्यापूर्वी सोमवारी प्रमिला कदम यांच्यासह त्यांच्या बीड येथील नातेवाईक महिला, मुले खरेदी करण्यासाठी दुपारी 3 वाजता फुले मार्केटमध्ये आल्या. याठिकाणी काही खरेदीही केली. मार्केटमध्ये फिरत असतांना गुप्ता शेवच्या दुकानाजवळ वळणावर त्या पर्स असलेल्या गाडीवर थांबल्या.

मार्केटमध्ये वळणावर पर्स लोटगाडीवर कदम यांची नणंद पर्स बघत होती, यादरम्यान त्याच्या मागे तीन ते चार अल्वयीन मुली होत्या. यावेळी एका 10 वर्षाच्या मुलीने उभ्या महिलेल्या हाताखालून हात घालत, अत्यंत चलीखीने गळ्यातील मंगलपोत तोडली, गळ्यातील पोत तुटताच महिलेने पोत ओढणार्‍या मुलींचा हात पकडला. यानंतर सोबत असलेल्या कदम यांच्यासह एक महिला व मुलांनाही प्रकार कळल्याने त्यांनीही पळण्याच्या प्रयत्नातील मुलीला पकडले. व तिला शहर पोलिसांच्या स्वाधीन केले. अल्पवयीन असल्याने प्रमिला कदम यांनी तक्रार देणे टाळले. सात ग्रॅमची 20 ते 25 हजाराची पोत सुखरुप मिळाल्याने कदम यांच्यासह महिलांनी घरचा रस्ता धरला. याप्रकरणी शहर पोलिसात नोंद घेण्यात आली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound