जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चिखलदरा येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांसाठी आयोजित साहसी शिबीरासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा संघ रवाना झाला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागातील रासेयो कक्षाव्दारा हे साहसी शिबीर २ ते ६ नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. या शिबीरासाठी विद्यापीठाच्या संघात राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक गौरव पाटील (मु.जे.महाविद्यालय, जळगाव), माधव पाटील (समाजकार्य विभाग, कबचौउमवि), मेहुल नांद्रे (उत्तमराव पाटील महाविद्यालय, दहिवेल), कुणाल मराठे (आरएफएन वरिष्ठ महाविद्यालय, अक्कलकुवा), लक्ष्मी वायकोळे (डॉ.अ.जी.डी.बेंडाळे महाविद्यालय, जळगाव), वृदांवना पाटील (पी.आर.घोगरे विज्ञान महाविद्यालय, धुळे), रोशनी सोनवणे (पीसीजीव्हीपीएम महाविद्यालय, शहादा) यांचा समावेश असून डॉ.प्रदिप राठेाड (सि.गो.पाटील महाविद्यालय, साक्री) हे संघ व्यवस्थापक आहेत. या संघास कुलगुरु प्रा.व्ही.एल.माहेश्वरी, रासेयो संचालक डॉ.सचिन नांद्रे यांनी शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले. यावेळी डॉ.विजय पाटील, डॉ.जगदिश सोनवणे, शरद पाटील, कैलास औटी, शिवाजी पाटील आदी उपस्थित होते.