Home धर्म-समाज लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना सर्व शक्ती सेनातर्फे अभिवादन

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना सर्व शक्ती सेनातर्फे अभिवादन

0
43

भुसावळ – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती सोमवारी सर्व शक्ती सेनाच्यावतीने साजरी करण्यात आली. यावेळी सर्व शक्ती सेनाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रा.संजय मोरे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

 

सर्व शक्ती सेनाच्यावतीने सोमवारी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी करण्यात आली. भुसावळ शहरातील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पूर्णकृती पुतळ्यास सर्व शक्ती सेनाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जाती विभागाचे महाराष्ट्र राज्य सचिव तसेच भारतीय दलीत साहित्य अकादमीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष प्रा. संजय मोरे, सर्व शक्ती सेना युवक आघाडीचे राज्य उपाध्यक्ष गजानन कांडेलकर, युवक जिल्हाध्यक्ष विष्णू मोरे, आकाश कोळी, हर्षल भोळे व मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो, असे प्रा. संजय मोरे यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले. याप्रसंगी युवक जिल्हाध्यक्ष मयुर कोळी, डॉ. महेंद्र सुरवाडे जिल्हा कार्याध्यक्ष विजय तायडे, जिल्हा उपाध्यक्ष धनराज कोळी, सिकंदर तडवी, प्रथमेश इंगळे, हितेश बाविस्कर, तेजस सपकाळे, बंटी झारापकर, प्रकाश भोई, दुर्गेश भोई, सागर भोई, प्रवीण भोई, कैलास भोई यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


Protected Content

Play sound