जळगाव प्रतिनिधी । कपड्यांचा मालाने ओव्हरलोड भरलेला ट्रकला विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने लागलेल्या आगीत ट्रकसह लाखो रूपयांचा माल जळाल्याची घटना आज दुपारी 12.45 वाजेच्या दरम्यान नशिराबादजवळ घडली. लागलेली आग दोन अग्नीशमनबंबाकडून विझविण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, कापडाने ओव्हरलोड भरलेला ट्रक क्रमांक (एमएच 27 एक्स 632 )अमरावतीलहून जळगावकडे येत असतांना दुपारी 12.45 वाजेच्या सुमारास नशिराबाद येथून जात असतांना विजांच्या तारांचा स्पर्श झाल्याने ट्रकमधील कापडाने आग लागली. नशीराबाद गावाजळ गणेश बॅटरीचे मालक गणेश चौधरी यांना ट्रकमध्ये आग लागल्याचे लक्षात आल्याने त्यांना तातडीने ट्रक चालकाला आगीची माहिती दिली. त्यानंतर ट्रक हॉटेल सोनीच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेवर आणून उभा केला. दरम्यान ट्रकमधील आग विझाविण्यासाठी ट्रकचालकाने ट्रक मागेपुढे केले असता बाजुला असलेल्या नाल्यात ट्रक पलटी झाला. ट्रक पलटी होताच आगीने रौद्र्यरूप धारण केले होते. ही आग विझविण्यासाठी दोन अग्निशमन बंबा बोलाविण्यात आले होते.
एकीकडे ही लाग लागल्यानंतर आग विझविण्यासाठी ट्रक चालकाची मोठी धावपळ सुरू होती मात्र गावातील नागरीकांना ट्रकमधील कापड लांबविण्यासाठी गर्दी जमली होती. आगीची माहिती नशीराबाद पोलीसांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेवून हा प्रकार थांबविला. या घटनेबाबत उशीरापर्यंत नशीराबाद पोलीसात नोंद घेण्याचे काम सुरू होते.