Home राजकीय मध्यरात्री मध्यस्थी : कडू विरूध्द राणा वादावर सामोपचाराचे प्रयत्न

मध्यरात्री मध्यस्थी : कडू विरूध्द राणा वादावर सामोपचाराचे प्रयत्न

0
31


मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वाद मिटवण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मध्यरात्री या दोन्ही नेत्यांची बैठक घेतली आहे.

माजी मंत्री, प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आमदार बच्चू कडू आणि अपक्ष आमदार रवी राणा यांच्यातील वाद आता चांगलाच पेटला आहे. या पार्श्‍वभूमिवर काल मध्यरात्रीच्या सुमारास वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या दोन्ही नेत्यांची समजूत काढण्यात आली. ही बैठक तब्बल अडीच तासांपर्यंत चालली.

बैठकीनंतर बच्चू कडू यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. तर रवी राणा यांनी फक्त हम साथ साथ है इतकेच म्हटले. आज दोन्ही नेते मुंबईत पत्रकार परिषद घेणार आहेत. यात बच्चू कडू हे आधी म्हणजे सकाळी नऊ वाजता प्रसारमाध्यमांशी संवाद साधणार आहेत. यात ते काय बोलणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Protected Content

Play sound