पाचोरा -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील निंभोरी बु” येथे दिवाळीच्या दिवशी लहान मुले फटाके वाजवीत असतांना अचानक फटाका शेजारी असलेल्या खळ्याला आग लागली.
पेटत्या फटाक्यांमुळे यामुळे भालचंद्र वाणी यांच्या खळ्यातील दादरचा चारा, मक्याची कुट्टी जळून खाक झाली. यामुळे भालचंद्र वाणी यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने याच खळ्यात भालचंद्र वाणी यांनी ५० क्विंटल कापूस ठेवलेला होता. मात्र शेजारच्या नागरिकांच्या खळ्याला आग लागल्याचे लक्षात येताच भैय्या रमेश पाटील, दत्तात्रय दिवटे, सचिन धुमाळ, गणेश मिस्तरी, एकनाथ दिवटे सह मोठ्या संख्येने नागरिकांनी धावपळ करून पाण्याच्या बादल्या, व जवळच असलेली बोरींग सुरू करून आग आटोक्यात आणल्याने पुढील होणारा मोठा अनर्थ टळला आहे.