यावल महाविद्यालयाचा नितीन सावळे चित्रकला स्पर्धेत प्रथम        

 

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज व्दारे संचलित यावलच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील प्रथम वर्ष कला वर्गाचा विद्यार्थी नितीन सावळे हा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथील विद्यार्थी विकास विभाग व डी. एन. महाविद्यालय, फैजपूर येथील विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला.

हे यश संपादन केल्याबद्दल कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या हस्ते प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व 3000 रुपये रोख बक्षीस देऊन फैजपूर येथे गौरव करण्यात आला.

महाविद्यालयातील या यशाबद्दल नितीन सावळे याचा सत्कार महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आला.

या कार्यक्रमात उपप्राचार्य प्रा. ए. पी. पाटील, प्रा. एम. डी. खैरनार, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. एस. पी. कापडे, आय. क्यू. ए. सी. चे समन्वयक डॉ. एच. जी. भंगाळे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. आर. डी. पवार, हिंदी विभाग प्रमुख डॉ. पी. व्ही. पावरा, डॉ. अनिल पाटील, प्रा. मयूर सोनवणे, प्रा. नरेंद्र पाटील आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

चित्रकला स्पर्धत हे यश संपादनाबद्दल नितीन सावळे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Protected Content